दिवाळीत हत्या, 28 वर्षांनी मुलाकडून दिवाळीतच बदला
कल्याण: केवळ संशय आणि त्यातून बदला घेण्याची मानसिकता यातून उच्चशिक्षित व्यक्तीकडूनही काय कृत्य घडू शकते याचे उदाहरण समोर आलं आहे. तब्बल 28 वर्षानंतर वडिलांच्या मारेकऱ्यांच्या संशयिताची हत्या करण्याचं कृत्य उच्चशिक्षित तरुणाने केलं. कल्याण तालुक्यातील कांबा इथं ही घटना घडली. सागर पावशे असं आरोपी तरुणाचं नाव आहे. सागर पावशेला आपल्या वडिलांच्या हत्येमध्ये भालचंद्र पावशे आणि त्यांच्या […]
कल्याण: केवळ संशय आणि त्यातून बदला घेण्याची मानसिकता यातून उच्चशिक्षित व्यक्तीकडूनही काय कृत्य घडू शकते याचे उदाहरण समोर आलं आहे. तब्बल 28 वर्षानंतर वडिलांच्या मारेकऱ्यांच्या संशयिताची हत्या करण्याचं कृत्य उच्चशिक्षित तरुणाने केलं. कल्याण तालुक्यातील कांबा इथं ही घटना घडली. सागर पावशे असं आरोपी तरुणाचं नाव आहे.
सागर पावशेला आपल्या वडिलांच्या हत्येमध्ये भालचंद्र पावशे आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असल्याचा संशय होता. 1990 मध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी सागरच्या वडिलांची हत्या झाली होती. याच संशयातून त्याने काल डाव साधत, दिवाळी पाडव्याच्या दिवशी संध्यकाळी भालचंद्र पावशे यांची डोक्यात दगड घालून हत्या केली.
याप्रकरणी टीटवाळा पोलीस स्थानकात सागर पावशे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.