माझ्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही, पण, डोळ्यात पाणी येण्याचं कारण राज ठाकरे यांनी सांगितलं
मराठीतचं नाही तर इतर भाषांमध्ये हर हर महादेव हा चित्रपट येणार आहे.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हर हर महादेव चित्रपट बघीतला. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले, काशिनाथ हे चांगला चित्रपट बनवतील याची मला खात्री होती. चित्रपट माध्यम मला समजतं. कळतं. आवडतं. हर हर चित्रपट पाहिल्यानंतर मी एकच सांगेन की, मेहनत काय असते. ते हे या चित्रपटात दिसते. खूप महिन्यांनी वर्षांनी उत्तम डायलॉग्स मला ऐकता आल्या. आनंद चित्रपट पाहताना भावनाविवश झालो होतो. सहसा माझ्या डोळात तसं पाणी येत नाही. पण, हर हर महादेव हा चित्रपट पाहताना असे काही प्रसंग होते की मी अभिजितला सांगत होतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनीच काय काम केली आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं हर हर महादेव हा चित्रपट पाहिला पाहिजे. माझा आवाज आहे की नाही, हा दुय्यम भाग आहे. पण, ऐतिहासिक चित्रपट कसा करायचा असतो, याचा एक उत्कृष्ट नमुना हर हर महादेव हा चित्रपट आहे, असं मला वाटतं. प्रत्येकानं तो पाहिला पाहिजे. प्रत्येकानं तो पाहिला पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती आहे. तरच या कष्टाचं चिज झालं असं मी म्हणेन, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठीतचं नाही तर इतर भाषांमध्ये हर हर महादेव हा चित्रपट येणार आहे. त्या स्केलचा तो असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मला असं वाटतं आता जे स्केल चालू आहेत, त्याच्या हा चित्रपट खूप पुढं आहे. मराठीत दर्जेदार चित्रपट येत आहेत. चांगले विषय येत आहेत.
अभिजित, सुबोध भावे यांनी खूप चांगली काम केली आहे. मराठी चित्रपट खूप पुढं जातील, याच्या आशा पल्लवित होणं हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांनी व्हाईस दिला आहे. व्हाईस कसा झाला तो मला माहीत नाही. कसा झाला तो तुम्ही सांगावा, असं राज ठाकरे म्हणालेत.