माझी बायको आता थोडी थोडी, पंजाबी बोलतेय, अभिनेता विकी कौशल
कतरीनाला आता मोडकी तोडकी पंजाबी येत असल्याचे विकी कौशल याने म्हटले आहे. 9 डिसेंबरला त्याच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी फिल्डमार्शल माणेकशॉ यांच्या जीवनावर बेतलेल्या सैम बहादूर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पहात आहे. पण सध्या तो आपली पत्नी अभिनेत्री कतरीना कैफ बरोबर नवीन संसाराची मजा लुटत आहे. कतरीना आता हळूहळू पंजाबी शिकत असल्याचे त्याने म्हटले आहे.
कतरीनाला आता मोडकी तोडकी पंजाबी येत असल्याचे विकी कौशल याने म्हटले आहे. 9 डिसेंबरला त्याच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“वोटी पंजाबी बोल लेंडी हैं, थोडी थोडी”, असे विकी कौशल यांने एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितले. परंतू तिचा ‘हांजी’ शब्दच मला जास्त आवडतो, प्रत्येक गोष्टीला ती प्रेमाने हांजी बोलते आणि आमच्या सुखी संसाराचं तिचे ते प्रत्येकवेळा ‘हांजी’ बोलणे हेच सिक्रेट असावं असे त्याने म्हटले आहे. अभिनेता विकी कौशल याचा गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी अभिनेत्री कतरीना कैफशी हीच्याशी विवाह झाला. नुकताच या कपलने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.