धारावीची लेक घेणार गगन भरारी, नद्रत बनणार पायलट
आपली इच्छाशक्ती असेल तर मनुष्य जीवनात कोणतेही कठीण काम करु शकतो. धारावीच्या सारख्या झोपडपट्टीत रहाणाऱ्या नद्रत या मुलीने आपले पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला फळ आले आहे. तिची प्रशिक्षणासाठी निवड देखील झाली आहे.
मुंबई | 5 जानेवारी 2024 : आकांक्षा पुढती, जिथे गगन ठेंगणे असे म्हटले जाते. तुमच्या आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणतेही अवघड काम करु शकता. हे सर्व आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा दुर्लोकीक असलेल्या धारावीत रहाणाऱ्या नद्रत हीने करुन दाखविले आहे. नद्रत हिच्या प्रचंड इच्छाशक्ती पुढे परिस्थितीने देखील हार मानत तिला साथ दिली आहे. पायलट बनण्याचे नद्रत हीचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. नद्रत हीने भारताच्या लेकी कुठल्याच बाबतीत कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहीतीनूसार नद्रत हिला लहान पणापासून विमानांची आवड होती. ती आकाशात उडणाऱ्या विमानांना पाहून या क्षेत्रात आपण जायला हवे अशी तिची इच्छा होती. परंतू तिने एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग करावे असे तिच्या आईला वाटायचे. परंतू आपल्या लहानपणापासून आपण पायलट तर नक्कीच बनू शकतो. परंतू परिस्थितीमुळे पायलट बनणे देखील कठीणच होते. तिच्या आईने तिला आपल्याला घर चालवायचे आहे आणि तुला शिक्षणही द्यायचे असल्याचे तिला समजावले. परंतू तरीही तिने मम्मीला सांगितले की जर उपरवाल्याची मर्जी असेल तर सर्व काही शक्य आहे.
भारत की बेटीची घेतली भेट
नद्रत हीने इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण्णा अकादमी संदर्भात इंटरनेटवर सर्च केले आणि प्रवेश परीक्षा देखील दिली. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅप्टन जोया अग्रवाल हीला ‘भारत की बेटी’ पुरस्कार मिळाला. तेव्हा जोया अग्रवालच आपले स्वप्न पूर्ण करू शकतात असे तिला वाटले. नद्रत हीची जोया अग्रवाल आयडॉल आहे. जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. नद्रत हीने जोया अग्रवाल हीला भेटण्यासाठी एअर इंडियाच्या पाच वेळा वाऱ्या केल्या. तरीही तिने हार मानली नाही. तिने मनात ठरविले की जोया अग्रवाल हीला भेटायचेच.
अखेर धारावीतील नद्रत हीची ‘भारत की बेटी’ जोया अग्रवाल हीची भेट झाली. नद्रत हीने सांगितले की तिने आधी जोया अग्रवाल हीला इंस्टाग्रामवर मॅसेज पाठवला. नंतर ईमेल देखील केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या ईमेलला उत्तर आला. ईमेलनंतर तिने जोयाला फोन केला आणि भेट घेतली. जोया मॅडम सोबत तिची भेट झाल्यानंतर तिचे स्वप्न सत्यात उतरले.
त्या मुलीचे स्वप्न पूर्ण करणार जिच्यात…
नद्रतचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मदत करणाऱ्या एअर इंडियाची पायलट कॅप्टन जोया अग्रवाल हीने सांगितले की ही एक सुरुवात आह. मी प्रत्येक मुलीला मदत करायला तयार आहे जिच्या काही करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. विमान क्षेत्र वेगाने वाढत असून येत्या 14-15 वर्षात त्याची वाढ दुप्पट वेगाने होणार आहे. आम्हाला महिला पायलटची गरज आहे. आम्ही मुलींना केवळ त्यांच्याकडे पैशांची आणि साधनांची कमी आहे म्हणून त्यांना निराश करु शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.