Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात 'साफल्य' ही चारमजली इमारत मध्यरात्री एक वाजता कोसळली

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 7:53 AM

नालासोपारा : महाड इमारत दुर्घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यातही केवळ 11 वर्ष जुनी इमारत कोसळली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चार मजली इमारत पडल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Nalasopara Safalya Building Collapse)

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही चारमजली इमारत होती. 2009 मध्ये ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये एकूण 20 फ्लॅट होते. इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे 15 कुटुंब आगोदरच दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. तर 5 कुटुंब याच इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन राहत होती.

इमारतीच्या काही भिंतींची माती काल (मंगळवार 1 सप्टेंबर) रात्री 10 वाजल्यापासूनच पडत होती. त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री 12 च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. मध्यरात्री एक वाजता सर्वांच्या डोळ्यासमोर अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही चारमजली इमारत कोसळली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

देवरुखकर बाहेर आले आणि…

इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण पाच कुटुंबांचे वास्तव्य होते. चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 401 मध्ये देवरुखकर कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात चार जण आहेत. इमारत कोसळण्याच्या 5 ते 10 मिनिट आधी ते चौथ्या मजल्यावरील घरात पैसे आणण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन इमारतीच्या गेटबाहेर पडत नाहीत, तोच त्यांच्या पाठीमागे इमारत कोसळली असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीत राहणारी पाचही कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने सुखरुप आहेत, मात्र त्यांचे घर-संसार या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्रीची वेळ असल्याने इमारतीचा ढिगारा काढायलाही अडचणी निर्माण झाल्या. (Nalasopara Safalya Building Collapse)

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 25 ऑगस्टला पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. अंदाजे 10 वर्षे जुनी इमारत पडल्याने एकच खळबळ उडाली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले होते. या दुर्घटनेत 16 जणांना प्राण गमवावे लागले होते.

संबंधित बातम्या :

महाडच्या शोध मोहिमेत 26 तास पोकलेन चालवलं, बीडचा 24 वर्षीय ‘रिअल हिरो’ किशोर लोखंडे

महाड दुर्घटनेत बचावलेल्या 4 वर्षीय चिमुरड्यांचं पालकत्व एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं

(Nalasopara Safalya Building Collapse)

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.