Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ईस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या; पालकमंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पूर्व मुक्त मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

'ईस्टर्न फ्री वे'ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या; पालकमंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
aslam shaikh
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 12:09 PM

मुंबई : पूर्व मुक्त मार्गास (Eastern Free Way) माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे एक पत्र शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. (Name the Eastern Free Way after Vilasrao Deshmukh; Aslam Sheikh’s demand to CM Uddhav Thackeray)

अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की, मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला.

या फ्री वेची लांबी 16.8 कि.मी. असून दक्षिण मुंबईतील ‘पी डीमोलो रोड पासून ते चेंबुर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोचपावती असेल, असेही अस्लम शेख यांनी पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

पूर्व मुक्त मार्ग (Eastern Freeway) हा मुंबई शहरामधील एक नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. कोणताही काटरस्ता अथवा वाहतूकनियंत्रक सिग्नल नसलेला हा महामार्ग पूर्णपणे द्रुतगती स्वरूपाचा असून यावर अवजड वाहने, दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, बैलगाड्या, पादचारी इत्यादींना प्रवेश नाही. या मार्गावर वाहनांना थांबता येत नाही.

मुंबईच्या पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा इत्यादी स्थानांसोबत एका जलद दुव्याने जोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. एम.एम.आर.डी.ए.ने तीन टप्प्यांमध्ये या मार्गाचे काम हाती घेतले. 12 जून 2013 रोजी पी. डि’मेलो रस्ता ते चेंबूरच्या पांजरपोळापर्यंतचा 13.59 किमी लांबीचा टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. 16 जून 2014 रोजी उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले व संपूर्ण 16.8 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग वापरात आला.

संबंधित बातम्या

Aslam Shaikh | मुंबई लोकल 3 टप्प्यात सुरु करणार : अस्लम शेख

Aslam Shaikh | शरद पवारांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र योग्यच – अस्लम शेख

(Name the Eastern Free Way after Vilasrao Deshmukh; Aslam Sheikh’s demand to CM Uddhav Thackeray)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.