Mumbai corporation election | मुंबई मनपा स्वबळावर लढणार, बिनधास्त नाना पटोलेंची बेधडक घोषणा

आम्ही आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai corporation election) स्वबळावर लढणावर आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

Mumbai corporation election | मुंबई मनपा स्वबळावर लढणार, बिनधास्त नाना पटोलेंची बेधडक घोषणा
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 4:24 PM

मुंबई : “आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai corporation election) आम्ही स्वबळावर लढणार आहोत,” अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. ते मुंबईमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना काँग्रेसची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Nana Patole announced that Congress will contest cndependently)

“यावेळची मुंबई महानगपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. आम्ही संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहोत. 2022 ची लोकसभा निवडणूक सध्या लांब आहे. मात्र, पक्षाचा विस्तार आणि स्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे नाना पटोले म्हणाले.

संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु

नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी धडाडीने काम करुने सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान त्यांच्या देहबोलीमध्ये एक आत्मविश्वास जाणवत होता. बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्व अशी नाना पटोलेंची ओळख आहे. आगामी काळात राज्यात मुंबई, औरंगाबाद, नाशिक, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये नाना पटोले आपल्या याच बिनधास्त आणि बेधडक स्वभावाला घेऊन विरोधकांशी दोन हात करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाना पटोले यांनी आगामी मुंबईची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपला नेहमी फेकण्याची सवय

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. मागील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. युती तुटण्याबद्दल मागील काही दिवसांपासून भाजप नेते नवनवे खुलासे करत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वसन दिलेच नव्हते, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी केले होते. यावर बोलताना “भाजपची फेकूगिरी दीड वर्षांनंतर त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शिवसेनेला बंद दाराआड काय आश्वासन दिले होते, याबद्दल काही माहीत नाही. पण भाजप नेहमीच फेकतो. भाजप कुठलंही आश्वासन पूर्ण करत‌ नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

इतर बातम्या :

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण काहीही बोलतात : नाना पटोले

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान

(Nana Patole announced that Congress will contest Mumbai corporation election independently)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.