केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणाला काँग्रेसचा कडाडून विरोध, नाना पटोले म्हणाले…
केंद्र सरकारने देश विकायला काढला आहे. सर्व संसदीय परंपरा मोडीत काढल्या जात आहेत, असे पटोले म्हणाले. (nana patole central government bjp privatization)
मुंबई : केंद्रातील सरकार देशातील सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत नाही. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा करावी लागते. यांनी देश विकायला (privatization) काढला आहे. सर्व संसदीय परंपरा मोडीत काढल्या जात आहेत,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी एका वेबीनारमध्ये बोलताना चार धोरणात्मक क्षेत्रे वगळता सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Nana Patole criticizes central government and BJP over the privatization)
“केंद्रातील सरकार देशातील सर्व सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत नाही. जर तसं करायचं असेल तर त्यासाठी आधी चर्चा करावी लागते. याबाबत राज्यसभा आणि लोसकभेत चर्चा करावी लागते. मात्र, केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढत आहे,” असे पटोले म्हणाले.
मोदी सरकारने भरमसाट सेस वाढवला
यावेळी बोलताना त्यांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत. असे असताना केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करतंय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात रस्त्यांचा विकास करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर फक्त 1 रुपया सेस होता. त्या काळात रस्ते चांगलं करण्याचं काम सुरू होतं. मनमोहनसिंग यांनीही हा सेस सुरू ठेवला. मात्र मोदी सरकारच्या काळात हा सेस तब्बल 18 रुपयांवर पोहोचला आहे.”
“स्वबळावर लढण्यास तयार रहा”
दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते धडाडीने काम करत आहेत. ते भाजपला वेळोवेळी लक्ष्य केलं आहे. मुंबईमध्ये 24 फेब्रुवारी रोजी बोलताना त्यांनी सर्व महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. “सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण आहे. काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा. स्वबळावर लढण्यास तयार रहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल. त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा,” असे नाना पटोले म्हणाले होते.
इतर बातम्या :