काँग्रेसमध्ये नवचैतन्य, आमच्या मुख्यमंत्री व्हावा…; नाना पटोले यांचं विधान नेमकं काय?

Nana Patole on Maharashtra CM and Mahavikas Aghadi : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे. नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं? नाना पटोलेंची प्रतिक्रिया वाचा सविस्तर...

काँग्रेसमध्ये नवचैतन्य, आमच्या मुख्यमंत्री व्हावा...; नाना पटोले यांचं विधान नेमकं काय?
नाना पटोलेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 7:43 PM

लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात चर्चा आहे ती विधानसभा निवडणुकीची… लोकसभेच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचा मोर्चा हा विधानसभा निवडणुकीकडे वळाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. याबाबतचा निर्णय हाय कमांड निर्णय घेतील. मात्र आमचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आले तर हायकमांड यावर निर्णय घेतील. सध्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं आमचं लक्ष आहे, असं नाना पटोले म्हणाले.

निवडणुकीवर भाष्य

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणुका लागल्या. एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून वाटाघाटी करू. पण ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले. कोकण आणि नाशिकमधून आमची तयारी आहे. किर आणि गुळवे त्यांनी गुळवे यांना बोलावून कांगण वाढले. अजून वेळ गेली नाही. आम्ही मुंबईत कुठेही अर्ज भरला नाही. काही भरला ते मागे घेतील बसून निर्णय व्हायला पाहिजे. वाद संपुष्टात येईल, असं पटोले म्हणाले.

मविआ आणि विधानसभा निवडणूक

जे खासदार उद्धव ठाकरेंना भेटायला जातात. आभार मानतात ही आमची संस्कृती आहे. जागावाटप वेगळा मुद्दा आहे.आमची भूमिका जोडून घ्यायची आहे. काँग्रेस अजूनही एकजुटीचा आहे. वाताहात भाजपने केली आहे. महाविकास आघाडी म्हणूनच भाजपच्या विरोधात आम्ही लढत आहोत. महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. महविकास आघाडी एकत्र लढेल. आमची भूमिका सर्व जागा लढू असं काही नाही, असं नाना पटोले म्हणाले.

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आणि मुलगा शेअर बाजारातून करोडपती झालेत. याची सीबीआय चौकशी केली पाहिजे नीट चौकशी झाली पाहिजे. माजी मुख्यमंत्री बिहारचे राम हे काल्पनिक म्हणत होते. भाजपसाठी सत्ता ही मोठी आहे धर्म आणि जातीवर जायचं नाही. ज्या लोकांना विश्वास आहे. ती जनता पाठीशी आहे. जिथे हारले तिथे भाजप रडत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.