Nana Patole: ‘ही’ सगळी स्क्रिप्ट ही दिल्ली सरकारची; आमदारांच्या 50 कोटींची चौकशी ईडीकडून का केली जात नाही; नाना पटोलेंचा सवाल

राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असला आणि राजकीय दृष्ट्या सरकार अस्थिर आहे. राज्यात अनेक समस्या आहेत,त्याकडे लक्ष न देता या राजकीय हालचालींची सध्याची संपूर्ण स्क्रीप्ट दिल्लीतील सरकारची आहे असे मत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

Nana Patole: 'ही' सगळी स्क्रिप्ट ही दिल्ली सरकारची; आमदारांच्या 50 कोटींची चौकशी ईडीकडून का केली जात नाही; नाना पटोलेंचा सवाल
अतिवृष्टी झालेल्या भागात काँग्रेसचे नेते एक्शन मोडवर, पाहणी दौऱ्यांचा सपाटा, सरकारला धारेवर धरणार, पटोलेंचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 5:03 PM

मुंबईः राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यात न्यायालयाची एन्ट्री झाल्यानंतर आता बंडखोर आमदार आणि नाराजीनाट्याच्या प्रकरणाने अधिकच वेग घेतला आहे. 16 आमदारांना नोटीस (16 MLA Notice) बजावल्यानंतर आणि गटनेतेपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाचे दार ठोठवल्यानंतर या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी सांगितले की, नोटीसीची प्रक्रीया 14 दिवसांच्या नियमाप्रमाणे असते. यामध्ये अध्यक्षांना हा कालावधी कमी करण्याचा अधिकार असतो मात्र सुप्रिम कोर्टानं (Supreme Court)आता हस्तक्षेप केल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई टळणं मुश्कील आहे, तसेच घटनेप्रमाणे पक्षांतर विरोधी कायदा कडक आहे. त्यामुळे अपात्रतेची कारवाई टळण्याचा स्कोप खूप कमी आहे असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

न्यायालयानं ठोस निर्णय दिलेला नाही

अविश्वास विश्वास ठरावाविषयी नाना पटोले यांनी बोलताना सांगितले की, अविश्वास ठऱाव आणण्याचा अधिकार असला तरी त्यामध्ये कुणीही उठलं आणि अविश्वास आणला असं होत नाही. त्यामुळेच याप्रकरणी न्यायालयानं ठोस निर्णय दिलेला नाही असंही नाना पटोले यांनी सांगितले.

संपूर्ण स्क्रीप्ट दिल्ली सरकारची

राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असला आणि राजकीय दृष्ट्या सरकार अस्थिर आहे. राज्यात अनेक समस्या आहेत,त्याकडे लक्ष न देता या राजकीय हालचालींची सध्याची संपूर्ण स्क्रीप्ट दिल्लीतील सरकारची आहे असे मत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

केंद्राचा हस्तक्षेप याप्रकरणात नको

राज्यातील आमदारांनी बंडखोरी करून गुवाहाटा गाठल्यानंतर नाराज झालेल्या शिलसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर, पोस्टरवर हल्ला करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटना घडल्यानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आणत केंद्राकडून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. त्यावर मत व्यक्त करताना नाना पटोले यांनी सांगितले की, बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा विषय हा राज्याचाच राहील. केंद्राचा हस्तक्षेप याप्रकरणात नको आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली नसताना, केंद्रीय सुरक्षा दलाचे अतिक्रमण सुरू असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला.

‘त्या’ गोष्टींचे समर्थन काँग्रेस करणार नाही

राज्यातीलील सुरक्षा व्यवस्थेती राज्यसरकारची जबाबदारी असतानाही कोणाला जर मारपीठ, धमक्या मिळत असतील तर त्या गोष्टीचे समर्थन काँग्रेस करणार नाही असं सांगत त्यांनी नाना पटोले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

भाजप सरकरामुळे सध्या सगळी गंमत

भाजप सरकरामुळे सध्या सगळी गंमत सुरु आहे. महाराष्ट्राची थट्टा सुरु आहे त्यामुळे आणखी 11 तारखेपर्यंत हॉटेलचा खर्चही वाढणार आहे. तोपर्यंत झाडी, डोंगार, हाटील बघावं लागेल अशी मार्मिक टिप्पणी नाना पटोले यांनी आमदार शाहाजी पाटील प्रतिक्रियेवर व्यक्त केली.

ईडीकडून भाजपच्या खर्चाची चौकशी का नाही

राज्यातील राजकीय परिस्थितीचा विरोध भास सांगताना त्यांनी संजय राऊत यांना ईडीची नोटीस आल्याचे सांगत, केंद्र सरकार गुवाहाटीती हॉटेलच्या खर्च, आमदारांना वाटले जाणारे 50 कोटी यांची चौकशी ईडीकडून का केली जात नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.