Narayan Rane : राणेंना हायकोर्टाचा दिलासा; मुख्यमंत्र्यांविरोधातल्या वक्तव्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पुन्हा एकदा दिलासा मिळालाय. त्यांना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Court) दिलेत. याप्रकरणी धुळे येथे एक तक्रार नोंदवण्यात आली होती.

Narayan Rane : राणेंना हायकोर्टाचा दिलासा; मुख्यमंत्र्यांविरोधातल्या वक्तव्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण
Narayan RaneImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 11:33 AM

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पुन्हा एकदा दिलासा मिळालाय. त्यांना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Court) दिलेत. याप्रकरणी धुळे येथे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याविरोधात राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राणे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत कोकण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उजवली होती. रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. आज 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

राणेंविरोधात कोणते आरोप?

राणे यांच्या या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये पहिली तक्रार दाखल झाली होती. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले होते. यावरून राणे यांचे अटक नाट्य चांगलेच रंगले होते.

राज्यभर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात याप्रकरणी राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. त्यात नाशिक, पुणे, रायगड, धुळे अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथके पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार हा अर्ज फेटाळला होता. आता अशाच एका धुळे येथील गुन्ह्याप्रकरणी राणे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.