संजय राऊत पळपुटा, नारायण राणे यांचा राऊत यांच्यावर पलटवार, नेमकं काय म्हणाले?
माझ्याकडं कात्रण आहेत. मी असा वाचून विसरणारा नाही. दखल घेणारा आहे.
मुंबई : संजय राऊतला (Sanjay Raut) मी पत्रकार मानत नाही. असं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणतात. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हा पलटवार केलाय. राजवस्त्र उतरवून या, असं संजय राऊत यांनी नारायण राणे यांना आव्हान दिलं होतं. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हा पळपुटा आहे म्हणून तो असं बोलतोय. कोण आहे हो संजय राऊत, तुम्ही नाव घेता कोण आहे. त्याचा पक्ष एवढा आहे, असं म्हणताना त्यांनी हाताच्या बोटांचा छोटासा भाग दाखविला.
नारायण राणे कार्यक्रमात बोलताना म्हणाले, माझ्याकडं कात्रण आहेत. मी असा वाचून विसरणारा नाही. दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. वाक्य न वाक्य वाचतो. २६ डिसेंबरला अग्रलेख मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही. मी पण त्याच्यावर केस टाकेन. १०० दिवस तो आतमध्ये राहिला. त्याला वाटलं असेल कमी झाले. आणखी जावं.
नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सर्व बाहेर काढतो आता मी. कोणता अग्रलेख परत वाचा. आणि परत सांगतो, नारायण राणे माझ्या नादाला लागू नको. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होता. तू आज मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले ५६ नि गेले. असा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा केला.
तू काय सांगतो आम्हाला लढायच्या गोष्टी रे. तुझी लायकी आहे का. अरे पादरा पावटा आहे रे तो. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. सगळ्यांना अरे तुरे करतो, असा घणाघातही संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केला.
नारायण राणे माझ्या नादी लागू नको, असा एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांनी नारायण राणे यांना इशारा दिला. नारायण राणे नामर्द असल्याचंही संजय राऊत म्हणाले. नारायण राणे यांच्या बोगस कंपन्या बाहेर काढणार असल्याचा इशाराही संजय राऊत यांनी दिला.