“आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; अजितदादांच्या वक्तव्यानं ‘या’ नेत्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य त्यांनी केले होते.

आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू; अजितदादांच्या वक्तव्यानं 'या' नेत्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 3:40 PM

मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या त्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवार यांचा मी निषेध व्यक्त करणार नाही, पण त्यांना छत्रपती संभाजीराजे माहिती नसतील, ते धर्मवीर होते हे माहिती नाहीत तर त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची गरज आहे असं मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मांडले.

नरेंद्र पवार यांच्या त्या प्रतिक्रियेवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी बोलताना राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले होते, त्यावेळी हे भाजपचे नेते कुठे गेले होते, आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा,नंतर बाकीचं बघू असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटचे भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, पण ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले होते.

त्यावरून भाजपचे नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना छत्रपती संभाजीराजे कोण होते हे माहिती नसतील तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिका नाही.

त्यांच्या वक्तव्याबद्दल आपण निषेध व्यक्त करणार नाही पण त्यांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार असल्याचे मत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.

नरेंद्र पवार यांनी अजित पवार यांन पाकिस्तानात पाठवण्याची भाषा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केली होती.

त्यामुळे आधी त्यांना पाकिस्तानात पाठवा नंतर अजित पवार यांचे वक्तव्य बरोबर आहे की नाही ते बघू असा पलटवार त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.