“खोदा पहाड निकला संजय राऊत”; शिंदे गटाच्या प्रवक्त्याने संजय राऊतांची मानसिक स्थिती काढली…

येत्या काही दिवसात कळेल किती आमदार किती खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खोदा पहाड निकला संजय राऊत; शिंदे गटाच्या प्रवक्त्याने संजय राऊतांची मानसिक स्थिती काढली...
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 8:48 PM

मुंबईः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील संघर्ष आता टोकाला गेला आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल ते धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर हा वाद आता आणखी पेटला आहे.

त्यातच आता संजय राऊत यांनी धर्मवीर वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर शिंदे गटाने त्यांच्यावर निशाणा साधत त्यांची मानसिक स्थिती बिघडली असून त्यांना मानसोपचारतज्ज्ञाच्या उपचाराची गरज असल्याचा टोला त्यांना लगावण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ज्या दिवसांपासून जेलमधून सुटले आहेत. त् यादिवसांपासून वायफळ गप्पा मारण्याचे काम ते करत आहेत.

तुरूंगातून सुटल्यापासून त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे माझ्या प्रभगामधे मेंटल हॉस्पिटल आहे कदाचित तिथेच त्यांना काही दिवस आणावं लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

नागपूर अधिवेशनला गेले आणि म्हणाले आम्ही असं करणार तसं करणार, परंतु एक म्हण आहे. ‘खोदा पहाड निकला संजय राऊत’ अशी परिस्तिथी आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

यावेळी शिवसेनेविषयी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, आज बाळासाहेबांचे विचार तत्व यावरच शिवसेना पक्ष उभा राहिला आहे.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत जे राष्ट्रवादीचे विचार मांडत असतात मात्र त्यावर उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रियाही नाही आणि साधा निषेधही त्यांनी नोंदवला गेला नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. ज्या अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.

त्या वक्तव्याशी मुळात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे विधानाशी सहमत आहे का हे स्पष्ट करावं असा टोला ठाकरे आणि राऊत यांना लगावण्यात आला आहे.

धर्मवीर म्हणायचं नाही अशा वक्तव्यावर निषेध पण व्यक्त करत नाही याचा अर्थ आम्ही अस म्हणायचं का संजय राऊत आणि ही मंडळी राष्ट्रवादीची धुणीभांडी करतात ? अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

संजय राऊत यांनी हे पाहावे उरलेले जे काही आमदार, खासदार आहेत जे नगरसेवक आहेत त्यातील आपल्याकडे किती राहणार आहेत.

येत्या काही दिवसात कळेल किती आमदार किती खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे अशी जहरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....