साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?

Narhari Zirwal on Sharad Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शरद पवार हे आमचं दैवत आहेत, असं अजित पवार गटाच्या नेत्याने म्हटलं आहे. कोण आहे हा नेता? विधानसभा निवडणुकीआधी घडामोडींना वेग, वाचा सविस्तर...

साहेब आमचे दैवत... अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 11:32 AM

राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटात प्रवेश करतील आणि निवडणूक लढतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. गोकुळ झिरवळ यांनी जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवार यांचं कौतुकही केलं आहे. शरद पवार हे आमच दैवत आहे आणि ते साहेब आहेत. त्यामुळे ते कोणाला उभं करत आहेत, हे अम्हाला माहीत नाही. त्यासंदर्भात आम्ही काही बोलणार नाही, असं झिरवळ म्हणाले.

गोकुळ झिरवळांबाबत काय म्हणाले?

गोकुळ झिरवळ हा माझा मुलगा आहे. त्यामुळे आमच्या घरात कुठलीही फूट पडणार नाही. गोकुळला आमदार व्हायचं नाहीये. शिवस्वराज्य यात्रा ही माझ्या मतदार संघात आली होती. तेव्हा गोकुळचे शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लागले होते. तेव्हा मी गोकुळ ला विचाराल तुला आमदारकी लढाईची आहे का? तेव्हा त्याने मला नाही असं सांगितलं. त्यामुळे गोकुळ हा माझ्यासोबत आहे, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळांनी दिलं आहे.

भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना महायुती मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असं झिरवळ म्हणाले.

आरक्षणावर काय म्हणाले?

आरक्षणाच्या मुद्द्यावरही नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलंय. आदिवासी समाजाच्या संरक्षणसाठी आज आम्ही सर्व जण एकवटणार आहोत आणि बैठक घेऊन याचा विरोध करणार आहोत. धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेतस असा निर्णय कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात न्यायालयात लढाई सुरू आहे. आम्ही आज बैठक घेऊन पुढील रणनीती कशी असणार हे ठरवणार आहोत, असं झिरवळांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.