Special Report : महापुरुषांचा गाजणार ‘सन्मान जागर’; कार्यक्रम असणार राष्ट्रवादीचा पण तोफ धडाडणार ठाकरे गटाची…
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्मान जागर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला जाणार असल्याचेही राष्ट्र्वादीकडून सांगितले जात आहे.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील किंवा भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील असतील ज्या ज्या नेत्यानी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली आहेत. त्यांना आता सडेतोड उत्तर देण्यासाठी 3 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सन्मान महापुरुषांचा, जागर महाराष्ट्राचा म्हणत महाराष्ट्रात महापुरुषांचा जागर गाजणार आहे. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली गेली आहेत.
त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिठकरी आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून महापुरुषांचा आणि त्यांच्या विचारांचा जागर घातला जाणार आहे. त्यासाठी 3 फेब्रुवारीपासून राज्यभरात सन्मान जागर सभा घेतली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्ती त्यामध्ये राज्यपाल, संजय गायकवाड, चंद्रकांत पाटील या भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात होती.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्मान जागर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला जाणार असल्याचेही राष्ट्र्वादीकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या सन्मान जागरसाठी सुषमा अंधारे यासुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
यामध्ये प्रमुख्य वक्ते असणार आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी हेसुद्धा असणार असल्याने बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
ठाकरे गटाकडून सन्मान जागर कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे या वक्ता बोलणार आहेत. त्यामुळे या सन्मान जागर सभेत आता ठाकरे गटाची तोफ धडाडणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे 3 फेब्रुवारी पासून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना सडतोड उत्तर मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.