नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक दिग्गज कलाकारांचा विजय, पहा कोण झाले विजयी ?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूह आणि आपलं पॅनल या दोन गटात चुरशीची लढत झाली. गेल्या पाच वर्षात नाट्य परिषद विश्वात अनेक उलथापालथ झाली.
मुंबई : नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ( Akhil Bhartiya Marathi Natya Parishad ) निवडणुकीच्या रिंगणात रंगकर्मी नाटक समूहाने बाजी मारली आहे. अभिनेता प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे मुंबई विभागात 8 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीसाठी 16 एप्रिलला मतदान झाले होते. मतदानानंतर रात्री उशिरापर्यत मतमोजणी सुरु होती. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नेमक्याच उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामुळे राज्यभरातील 60 पैकी 20 जागांवरील उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूह आणि आपलं पॅनल या दोन गटात चुरशीची लढत झाली. गेल्या पाच वर्षात नाट्य परिषद विश्वात अनेक उलथापालथ झाली. कोरोनाच्या काळात रंगकर्मी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. यामुळे परिषदेमध्ये दोन गट पडून त्यात वादही झाले होते.
नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती शाखेच्या 10 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने 8 जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर, प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी – मोने हे दोन सदस्य विजयी झाले आहेत. मुंबई उपनगरमध्ये दोन जागा प्रशांत दामले यांच्या पॅनलला तर दोन जागा प्रसाद कांबळी यांच्याकडे गेल्या आहेत.
‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे विजयी उमेदवार
प्रशांत दामले ( 759 मते ), विजय केंकरे ( 705 मते ), विजय गोखले ( 664 मते ), सयाजी शिंदे ( 634 मते ), सुशांत शेलार ( 623 मते ), अजित भुरे ( 621 मते ), सविता मालपेकर ( 591 मते ), वैजयंती आपटे ( 590 मते )
‘आपलं पॅनल’चे विजयी उमेदवार
सुकन्या कुलकर्णी-मोने ( 567 मते ) आणि प्रसाद कांबळी ( 565 मते )
पराभूत उमेदवार
मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे