गवार 60, तर टोमॅटो 35 रुपये प्रतिकिलो, APMC मार्केटमध्ये भाज्या कडाडल्या

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी 250 ते 300 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. (Navi Mumbai Vegetable Price increase)

गवार 60, तर टोमॅटो 35 रुपये प्रतिकिलो,  APMC मार्केटमध्ये भाज्या कडाडल्या
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 8:58 AM

नवी मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल खराब झाल्याने त्याची आवक घटली आहे. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये आज केवळ 100 ते 120 गाड्या दाखल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. (Navi Mumbai APMC Market Vegetable Price increase)

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी 250 ते 300 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी दुसरीकडे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येक भाजीचे दर हे 10 ते 20 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तसेच पालेभाज्यासुद्धा महागल्या आहेत.

सध्या नवी मुंबईत टोमॅटोचे दर हे 35 ते 40 रुपये किलो असून किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री 50 ते 60 रुपये प्रतिकिलो सुरु आहे. तर शेवगा 60 ते 70 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. आधी लॉकडाऊन आणि आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.

भाज्यांच्या घाऊक किंमती

भाजी – किंमत (प्रतिकिलो)

  • गवार – 60 ते 65 रुपये
  • भेंडी – 30 ते 35 रुपये
  • शेवगा – 65 ते 70 रुपये
  • कारले – 35 ते 40 रुपये
  • टोमॅटो – 35 रुपये
  • वांगी – 25 ते 30 रुपये
  • काकडी – 25 रुपये
  • कोबी – 30 ते 35 रुपये
  • कोथिंबीर – 10 ते 15 रुपये

(Navi Mumbai APMC Market Vegetable Price increase)

संबंधित बातम्या : 

कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या

नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.