मी प्रेग्नंट, होणारं बाळ देते, 60 हजार द्या, बारबालेचा बनाव, बाळचोरीचा गुन्हा उघड
प्रेग्नंट असल्याचं भासवून, डिलिव्हरीनंतर जन्मलेलं बाळ देऊ असं सांगा, बाळाची चोरी करणाऱ्या बारबालेला अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई : प्रेग्नंट असल्याचं भासवून, डिलिव्हरीनंतर जन्मलेलं बाळ देऊ असं सांगा, बाळाची चोरी (Navi Mumbai child thief) करणाऱ्या बारबालेला अटक करण्यात आली आहे. आरोपी बारबालेने उत्तर प्रदेशातून अडीच महिन्यांचं बाळ चोरून, (Navi Mumbai child thief) नवी मुंबईतील एका जोडप्याला विकण्याचा घाट घातला होता. मात्र पोलिसांनी हा घाट हाणून पाडत चिमुकल्या बाळाची सुटका केली. आरोपी बारबाला प्रेग्नंटही नव्हती, मात्र तरीही तिने तसं भासवून, हॉस्पिटलचे 60 हजार रुपये भागवा आणि होणारं बाळ घेऊ जा, असं म्हणून चोरलेलं बाळ विकण्याचा घाट घातला होता.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्याला लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्य नव्हतं. त्यांचा एका बारबालेशी संपर्क आला. त्या बारबालेने संबंधित दाम्पत्याला आपण प्रेग्नंट असल्याचं सांगत, होणारं बाळ तुम्हाला देतो, पण रुग्णालयाचे 60 हजार रुपये भागवा असं सांगत, पैसेही उकळले. त्यानंतर आरोपी बारबालेने उत्तर प्रदेशातील आग्र्याला जाऊन, तिथून एक अडीच महिन्यांचं बाळ चोरलं.
दरम्यान, या बाळचोरीची तक्रार संबंधित पालकांनी आग्रा पोलिसात दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन, बाळाच्या शोधासाठी एक पथक तयार केलं. हे पथक शोध घेत नवी मुंबईत पोहोचलं. त्यावेळी एपीएमसी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलं. त्या महिलेच्या माहितीनंतर आरोपी बारबालेला अटक करण्यात आली.