मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महापालिकेकडून अभय योजना जारी

मालमत्ता थकबाकिदारांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेडून मालमत्ता अभय योजना 2020-21 लागू करण्यात आली आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महापालिकेकडून अभय योजना जारी
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 10:27 PM

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली जात आहे. यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची 25 टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची 75 टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या योजनेची घोषणा केली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation implements ‘Property Tax Abhay Yojana’)

नमुंमपाच्या या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. ‘मालमत्ता कर अभय योजने’चा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 असा राहील. या योजनेंतर्गत 31 मार्च 2020 पर्यंत थकित कर असणाऱ्या, तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर 31 डिसेंबर 2020 पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

कोव्हि-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असल्याने थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणीदेखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर अर्ज भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे महापलिका मुख्यालय आणि महापालिकेच्या कार्यालयाच्यां ठिकाणी रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नमुंमपाच्या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल App वर अभय योजनेबाबतची विशेष लिंक दिली जाणार आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग / एनईएफटी/ आरटीजीएसच्या माध्यमातून कराचा भरणा करता येणार आहे.

इतर बातम्या

रुग्णालयात गैरहजर अधिकाऱ्यांना थेट नोटिसा, नवी मुंबई पालिका आयुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर

नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई

(Navi Mumbai Municipal Corporation implements ‘Property Tax Abhay Yojana’)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.