Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : तुमचं अनाधिकृत बांधकाम का पाडू नये? नवनीत राणा यांना महापालिकेची पुन्हा नोटीस

नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या घराच्या बांधकामाची मुंबई महापालिकेकडून (BMC) पाहणी करण्यात आली. यातील काही बांधकाम हे अनाधिकृत असल्याचा आणि परवानगी मिळालेल्या बांधकामात बदल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आता हे बांधकाम 7 दिवसात का पाडू नये? असा सवाल करत मुंबई महापालिकेने पुन्हा नवनीत राणा यांना नोटीस बजावली आहे.

Navneet Rana : तुमचं अनाधिकृत बांधकाम का पाडू नये? नवनीत राणा यांना महापालिकेची पुन्हा नोटीस
तुमचं अनाधिकृत बांधकाम का पाडू नये? नवनीत राणा यांना महापालिकेची पुन्हा नोटीसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 6:38 PM

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. मात्र अलिकडे त्यांनी हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa) हे मातोश्रीबाहेर जाऊन करु अशी हाक दिली आणी आगीत तेल पडावं तसा हा संघर्ष आणखी भडकला. त्यानंतर शिवसेनाही राणांविरोधात आक्रमक झाली. हे प्रकरण आंदोलन आणि पोलिसांपर्यंत पोहचलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाली. त्यांना काही दिवस जेलमध्ये काढावे लागले. मात्र याचदरम्याने नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या घराच्या बांधकामाची मुंबई महापालिकेकडून (BMC) पाहणी करण्यात आली. यातील काही बांधकाम हे अनाधिकृत असल्याचा आणि परवानगी मिळालेल्या बांधकामात बदल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आता हे बांधकाम 7 दिवसात का पाडू नये? असा सवाल करत मुंबई महापालिकेने पुन्हा नवनीत राणा यांना नोटीस बजावली आहे.

नोटीशीत नेमकं काय?

या नोटीशीत लिहिले आहे की, तुम्ही केलेल्या बांधकामातील काही भाग हा नियमांप्रमाणे नसून अनाधिकृत आहे. कायद्याच्या कलम 351 (IA) द्वारे मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, तुम्ही किंवा तुमच्याद्वारे नियुक्त एजंटद्वारे आणि खाली स्वाक्षरी केलेल्या लेखी विधानाद्वारे पुरेसे कारण दाखवण्यासाठी तुम्हाला निर्देश देण्यात येत आहेत. ही नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत इमारत किंवा हे अनाधिकृत काम का पाडले जाऊ नये? असा सवाल नोटीशीत केला आहे. तसेच या नोटीशीत पुढे लिहिले आहे की, हे लक्षात घ्यावे की पुरेशी कारणे दाखवणे म्हणजे उक्त नोटीसमध्ये नमूद केलेले काम सदर अधिनियमाच्या कलम 137, 347 आणि कलम 147 मधील तरतुदींनुसार झाले हे सिद्ध करणे होय.

तसेच हे लक्षात घ्यावे की जर तुम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे पुरेसे कारण दाखवण्यात अयशस्वी ठरलात तर आठवड्यात इमारत तुमच्या जोखमीवर आणि खर्चावर कारावाई करण्यात येईल. तसेच तुम्ही दंडास आणि तुरुंगवासासही पात्र असाल. अशी खरमरीत नोटीस महापोलिकेने आता राणा यांना बजावली आहे. त्यामुळे सात दिवसात राणा यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास पालिका काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या पालिकेच्या नोटीशीवरून राणा यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवाला आहे.

हे सुद्धा वाचा

राणा दाम्पत्य काय म्हणाले?

याबाबत बोलताना सोमवारी राण दाम्पत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पालिकेने उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आणि सुडबुद्धीने ही नोटीस बजावली आहे. यांनी आजपर्यंत अनेकांची घरं पाडली आहे. उद्या आमचेही घर हे पाडू शकतात. मात्र मुंबईत आमचे एकच घर आहे. शिवसेनेच्या नेत्यांसारखी दहा घरं नाहीत. मात्र मला बेघर केलं तरी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया यावेळी राणा दाम्पत्याने दिली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारविरोधात तक्रार करत नवनीत राणा दिल्लीत पोहोचल्या आहेत.

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.