Navneet Rana : नवनीत राणा उद्या दिल्लीत जाऊन भाजपच्या बड्या नेत्यांना भेटणार, केंद्रीय गृह सचिवांकडे तक्रारीची शक्यता
याबाबत उद्या केंद्रीय गृह सचिवांकडे तक्रार करण्याचीही शक्यता आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाल्या. जेलमध्ये त्यांना जाणूनबुजून त्रास दिला गेला, असे आरोप झाले.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) त्यांच्या अटकेमुळे आणि हनुमान चलीसा (Hanuman Chalisa) पठणावरून झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. भाजप नेत्यांकडून त्यांचं समर्थन केलं जातंय. तसेच महाविकास आघाडीवर यावरून जोरदार टीका होते आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीवरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी आधीही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. मात्र आता पुन्हा त्या दिल्लीत दाखल होत दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर याबाबत उद्या केंद्रीय गृह सचिवांकडे तक्रार करण्याचीही शक्यता आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाल्या. जेलमध्ये त्यांना जाणूनबुजून त्रास दिला गेला, असे आरोप झाले. त्यानंतर जेलमधून सुटून त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा रडतानाही दिसून आल्या. आता पुन्हा त्या राज्य सरकारविरोधत आक्रमक झाल्या आहेत.
राणांवर चुकीचे केस दाखल केली-कंबोज
नवनीत राणा दिल्लीत जाऊन राज्य सरकारची तक्रार तर करणाच आहेत. मात्र भाजप नेत्यांनीही आज त्यांच्या घरी दाखल होत. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. कोर्टानेही सांगितलं की हनुमान चलीसाचा पाठण करणं देशद्रोह होत नाही. राज्य सरकार भाजप आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांच्या वापर करत आहे. एकीकडे चुकीची केस आणि त्यानंतर एका खासदार महिलेवर पोलीस ठाण्यात गैरव्यहार करण्यात आला. याची चौकशी झाली पाहिजे. उद्या नवनीत राणा आणि रवी राणा दिल्ली जाणार तिथे होम सेक्रेटरी आणि मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. माझी मागणी आहे की खार पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनची चोकशी झाली पाहिजे, असे कंबोज म्हणाले.
तर कळुद्या राज्याचा नेता कोण?
तर मला, राणेंना आणि आता नवनीत राणांना मुंबई महानरपालिकेची नोटीस आली आहे. जेव्हा काही करायला नसते तेव्हा नोटीस देतात, राज्य सरकार भाजप नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी काय काय करत आहे, हे सर्वांना दिसत आहे. तसेच शिवसेनाचे शेर फक्त कागदी शेर आहेत. पोलिसांच्या वापर करुन गुंडागर्दी करतात. नवनीत राणा यांचं चैलेंज मान्य असेल तर अमरावतीत जाऊन निवडणूक लडले पाहिजे. लोकांना कळेल की महाराष्ट्रचा नेता कोण आहे, असे चैलेंजही त्यांनी शिवसेनेला पुन्हा दिले.
राज ठाकरे यांच्यासमोर बाकीचे ठाकरे परेशान
तर न्यायालयाचा त्यांनी कुठलाही अवमान केला. त्यांनी असे कुठलेही स्टेटमेंट दिलं नाही. त्यांनी केसवर कुठलही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच पोलीस कमिश्नर संजय पांडेय यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सांताक्रूझ पोलीस स्टेशलाचा आहे, असेही ते म्हणाले. तसेच आदित्य ठाकरेंनी आजपर्यंत भोंग्यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही. राज ठाकरे यांच्या लोकप्रियता हिंदुत्वाने वाढत आहे. राज ठाकरे यांच्यासमोर बाकीचे ठाकरे परेशान आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना अजमेर घेवून जावं. बनारस मशिदीमध्ये घेवून जावं. त्यानंतर अयोध्याची गोष्ट करावी अशी टीकाही त्यांनी केली आहे.