‘.. आणि म्हणून फडणवीस घाबरले!’, नवाब मलिकांचा फडणवीसांवर पलटवार

नवाब मलिकांनी फडणवीसांवर पलटवार केलाय. तो अहवाल लोकांच्या समोर ठेवणं हे माझ कर्तव्यच असल्याचं नवाब मलिक म्हणालेत.

'.. आणि म्हणून फडणवीस घाबरले!', नवाब मलिकांचा फडणवीसांवर पलटवार
Nawab Malik and Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:01 PM

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ शमत नाही तोवर फोन टॅपिंगवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आपण फोडलेला नाही. मी या अहवालाचं फक्त कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसार माध्यमांना उपलब्ध करुन दिला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर आता मलिकांनी फडणवीसांवर पलटवार केलाय. तो अहवाल लोकांच्या समोर ठेवणं हे माझ कर्तव्यच असल्याचं नवाब मलिक म्हणालेत.(Nawab Malik criticizes Devendra Fadnavis over confidential report in police transfer case)

देवेंद्र फडणवीस घाबरले – मलिक

फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती वर्षा निवासस्थान, मंत्रालय, मनपा कार्यालयात येत होती. राज्याचे अधिकारी भेटायचे. त्यात निरज गुंडेनं ट्वीट करुन या अहवालाबाबत सांगितलं. हा अहवाल दोन ठिकाणांहून फुटला. डीजीपी कार्यालय आणि निरज गुंडे यांनी हा अहवाल फोडला. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस घाबरले असतील, असा टोला मलिकांना लगावलाय. आता फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते म्हणतात की मलिकांनी अहवाल फोडला. आम्ही तो अहवाल मांडला, आमचा तो अधिकार आहे, असंही मलिक म्हणालेत.

‘रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान’

देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो 6 जीबीचा डेटा दाखवावा, असं आव्हानच मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला आहे.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला: फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

‘पुण्याच्या आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या’

Phone Tapping: जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी रिपोर्ट तयार केला असावा, सीताराम कुंटेंनी फक्त सही केली: देवेंद्र फडणवीस

Nawab Malik criticizes Devendra Fadnavis over confidential report in police transfer case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.