Nawab Malik : झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंंगे, ईडीच्या ताब्यातून नवाब मलिकांचा एल्गार

मलिकांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास ईडीने मनाई केली होती. तरीही ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांनी केली आहे.

Nawab Malik : झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंंगे, ईडीच्या ताब्यातून नवाब मलिकांचा एल्गार
नवाब मलिक यांना अटक
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 3:38 PM

मुंबई : आज पाहटेपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्र नवाब मलिक (Nawab Malik) यांची चौकशी सुरू होती. त्यांना दुपारी ईडीने (ED) अटक केली. यावेळी दोन्ही बाजुने जारदार राजकीय वार-पलटवार सुरू असताना, ही अटक झाल्याने वातावरण आणखीच तापलं आहे. नवाब मलिक यांना त्यानंतर मेडिकला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र मलिकांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास ईडीने मनाई केली होती. तरीही ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांनी केली आहे. यावेळी जेजे रुग्णालय परिसरात जिथे मलिकांचे मिडीकल करण्यासाठी नेण्यात आलं तिथेही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे दिसून आले. ही कारवाई सुडाच्या भावनेतून होत असल्याची खरपूस टीका भाजपकडून करण्यात येत आहे. तर तसे वाटत असेल तर कोर्टात जा, असे भाजप नेते बजावत आहेत.

दोन्ही बाजूने तिखट प्रतिक्रिया

नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. हे होणारच होते.मंत्री मंडळात डी काय आणखी भरपूर कंपनीची माणसे आहेत. असे सूचक विधान केले आहे. तर ईडी समोर आता बोल म्हणावं नायतर तुझ्या हातात विडी देतील, असा टोलाही राणेंनी लगावला आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कारवाईला आक्षेप घेत मलिकांना अगोदर नोटीस देणे बंधनकारक होते. त्यानंतर चौकशीला बोलावले पाहिजे होते, असा दावा केलाय. त्यामुळे यावरून आता जोरदार राजकीय खडाखडी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांचा संबंध डी गँगशी असल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी शंका चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थित केली आहे.

सुडाचं राजकारण कोण करतंय?

सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत. नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल भातखळकर बोलत होते. केंद्रीय यंत्रणांचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो. नवाब मलिकांना जर ED ने बोलवल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. माझ्या माहितीनुसार इक्बाल कासरकर पासून दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, किंबहुना नवाब मलिक हे त्यांचे मित्र म्हणून वावरतात हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देतील. ED कायद्याच्या कक्षेत राहून काम करेल. मलिकांना मान्य नसेल तर न्यायालय आहेच, असंही ते म्हणालेत.

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

नोटीस न देता मलिकांच्या ED चौकशीला गृहमंत्र्यांचा आक्षेप; कायदा काय म्हणतो, सांगताहेत उज्ज्वल निकम…

नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली गंभीर शंका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.