“कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही”, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?

आंदोलनावरून पुन्हा महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण नवाब मलिक यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:10 PM

मुंबई : पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Speech) संसदेत काँग्रेसने (Congress) कोरोना पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर काँग्रेसकडून माघार घेण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून पुन्हा महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण नवाब मलिक यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय?

या आंदोलनावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेत भिन्नता दिसून आली आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेब आंदोलन करु नये. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते. त्यामुळे हा नवा पायंडा योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने हे करू नये. यामुळे प्रशासनावर, पोलिसांवर ताण येतो. त्यामुळे सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. आंदोलन करायला जागा ठरवून दिली आहे. तिथे आंदोलन केले पाहिजे, असे परखड मत नवाब मलिक यांनी मांडले आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोदींच्या काळात घोटाळेबाजांचा सुळसुळाट

तसेच मोदींच्या काळात जास्त घोटाळे झाले, असा आरोपही राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी 23 हजार कोटींची बँक घोटाळा उघडकीस आला आहे. 2015 साली याची तक्रार होऊनही सीबीआयने एवढी वर्ष गुन्हा दाखल केला नाही. सीबीआयने याबाबत गो स्लो भूमिका घेतली. मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटीचे घोटाळे झाले. घोटाळे करणारे परदेशात लपून बसतायत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. अनेक घोटाळ्यात भाजपच्या नेत्यांचा थेट संबंध आहे. भाजपच्या जवळचे लोक कोट्यवधी रुपये खात आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या

माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?

VIDEO: तर उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच ‘I Love You’ चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.