मुंबईः राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असताना मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mikthkari) यांना आमच्यासोबत जोपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) आहेत, तोपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणं कठीण असणार अस मतही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. भाजपने (BJP) ही खेळी खेळली असली तरी आता आमदार नितीन देशमुख आता पुन्हा आले आहेत, त्याचबरोबर आता एक-एक आमदार परत येत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
बंडखोर आमदारांविषयी शिवसेनेकडून ज्यावेळी पत्रक काढले त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हा प्रश्न शिवसेनेचा असून तो मुख्यमंत्र्यांचा अंतर्गत प्रश्न असून ते प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे ते आता पुन्हा फोन करत असून आम्हाला पुन्हा यायचे आहे असं आमदार सांगत असल्याची माहितीही त्यांनी सांगितली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास सक्षम असून भाजपला अपेक्षित असलेली परिस्थिती त्यांना करता प्राप्त होणार नाही असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात वेगळं असं काही तरी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय घडामोडीत कधी काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळे माध्यमांनाच त्यांनी तुम्हांला तरी वाटलं होत का महाविकास सरकार येईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी कालच्या बंडखोर आमदारांना विमानातून गुवाहाटीला हलविताना मोहित कंबोज यांच्याविषयी विचारले असता त्यांनी मोहित कंबोज हे भाजपचे एजंट असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थिती राज्यात भाजपचे सरकार येणार नाही असा दावा अमोट मिटकरी यांनी केला. त्याचबरोबर राज्यावर आलेले हे राजकीय संकटही लवकरच दूर होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या स्वप्नाला सुरूंग लागणार अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नाट्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडी आणि भाजपकडून सत्तासंघर्षासाठी चाललेला खेळ याविषयीही अमोर मिटकरी यांनी बोलताना गालिबचा शेर सांगत भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यावेळी त्यांनी, गुजर जाएगा ये दौर भी गालिब, जरा इत्मिनान तो रख, जब खुशी ना ठहरी, तो गम की क्या औकात है असं म्हणत आजच्या चाललेल्या राजकीय नाट्यविषयी आपले मत व्यक्त केले.
या भेटीविषयी ज्यावेळी त्यांनी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितल की, सहज भेटायला बोलवलं होतं त्यामुळे भेट घेण्यासाठी आलो होतो. यावेळी शरद पवार यांनी लोकप्रतिनिधींच्या मनात काय आहे, आपण पुढं कस जायला पाहिजे याविषयी भावना जाणून घेतल्या. याबरोबरच उद्या पुन्हा एक बैठक होणर असून महाविकास आघाडीबरोबर सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.