BREAKING | अजित पवार नाराजीच्या बातम्या, खरंच दिल्लीला रवाना? Tv9 मराठीच्या हाती सर्वात महत्त्वाची माहिती

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता खुद्द अजित पवार यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे.

BREAKING | अजित पवार नाराजीच्या बातम्या, खरंच दिल्लीला रवाना? Tv9 मराठीच्या हाती सर्वात महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 8:22 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनाही पत्रकार परिषदेवेळी यावेळी प्रश्न विचारण्यात आले. पण इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं शरद पवार यांनी पत्रकारांना आवाहन केलं. पण त्यानंतरही अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. आता अजित पवार यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती देत मी दिल्ली गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं.

मी दिल्लीला गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. अजित पवार मुंबहून पुण्याच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

येत्या 9 तारखेला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार

शरद पवार आणि अजित पवार येत्या 9 तारखेला साताऱ्याला एका जाहीर कार्यक्रमात एकत्र दिसतील. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मी नॉट रिचेबल नाही. तर रिचेबल आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माझ्याबद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या नाराजीच्या बातम्या तथ्यहीन आहेत, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

अजित पवार यांचं तीन तासांनी ट्विट

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सुरुवातीचे दोन ते तीन तास अधिकृत अशी प्रतिक्रिया समोर आली नाही. याउलट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी साधं ट्विटही न केल्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय आहे? त्यांची प्रतिक्रिया काय? अशी चर्चा रंगू लागली. पण त्यानंतर अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्यांनी शरद पवार यांच्या राजीनामा मागे घेतल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

खरंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याला विरोध केला. पण अजित पवार यांनी नवा अध्यक्ष का नको? असा प्रश्न उपस्थित केला. पण त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर अजित पवार यांनी शरद पवार हेच पक्षाध्यक्ष असावेत, अशी भूमिका घेतली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.