Ajit Pawar | निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवणार की नाही? अजित पवार म्हणाले…

ajit pawar election : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बैठक घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच येती निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार आहे याबाबतही सांगितलं आहे.

Ajit Pawar | निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवणार की नाही? अजित पवार म्हणाले...
ajit pawar and devendra fadnavisImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 6:48 PM

अक्षय मंकणी, मुंबई : राष्ट़्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच येत्या निवडणुकीमध्ये निवडणूक घड्याळ की कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत याबाबतही जाहीरपणे सांगितलं आहे. महायुतीत अंतर पडेल असं काही वागू नका, असं अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो. मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहे त्यासाठी संघटनात्मक काम करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठांवर आपल्याला टीका करायची नाही पण कोणी आपल्या नेत्यांवर बोललं तर जशास तसं उत्तर द्या. कमळाच्या चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.  प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो वयोमानाप्रमाणे नवी पीढी पुढे येत असते त्यांना मार्गदर्शन करावे लागते मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते. काही जण जाणीव पुर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाही. कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात मात्र तसं काही नाही. आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायची नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे. खर्गे यांचं नाव काँग्रेसकडून पुढे येत आहे. मोदींविरूद्ध खर्गे यात तुम्हीच विचार करा खर्गे यांनी काही फार मोठे नेतृत्व केलं नाही. जनता मोदींनाच पाठिंबाच देणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.