बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्विकारणारा शुब्बू लोणकर नेमका कोण? बिश्नोई गँगशी कसा आला संपर्कात? जाणून घ्या A टू Z माहिती
शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता अकोला पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे.
Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. यातच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मराज कश्यप , गुरनैल सिंह आणि प्रवीण लोणकर अशी त्यांची नावे आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. शुब्बू लोणकर (शुभम लोणकर) नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. आता हा शुब्बू लोणकर नेमका कोण अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची सध्या केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे. ही फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचाही तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर हे ज्याचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता अकोला पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे.
याआधीही झालेली कारवाई
अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी दाखल झाले आहेत. मात्र शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्याच्या घरी कोणीही नसल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी त्याच्याकडून तब्बल तीन पिस्तुल आणि 11 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गावात नाही. त्यामुळे तो पुण्यात असावा असा संशय आहे.
दरम्यान फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास सध्या केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर हे ज्याचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव हे शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.
शुभम लोणकर नेमका कोण? बिश्नोई गँगशी कसा झाला संपर्क?
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे दोघे सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले गेले. बिश्नोई टोळीला हत्यारे पुरवल्याबद्दल शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर त्याच्या मूळ गावी होता. तर प्रविण लोणकरने पुण्यातील वारजे भागात डेअरी आणि किराणा विक्रीचे दुकान सुरू केले होते.
शुभमच्या सांगण्यावरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग हरियाणा आणि उत्तर प्रदेशातुन पुण्यात येऊन राहिले . प्रविण लोणकरने त्याचे दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिले होते. पुण्यात राहून अनेकदा त्यांचे मुंबईला येणे जाणे सुरू होते आणि सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला जात होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातून त्यांचा मुक्काम मुंबईला हलवला होता.