बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु

मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल.

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरु
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 4:35 PM

Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वांद्र्यासह संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दींकींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात दाखल

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पहाटे साडे पाच वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणण्यात आला. यानंतर आठ वाजता बाबा सिद्दिकी यांचं शवविच्छेदन करण्यास सुरुवात होईल. यावेळी व्हिडिओग्राफीदेखील केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण तीन ते चार तासांचा कालावधी लागणार असल्याचे बोललं जात आहे.

मकबा हाईटमध्ये शेवटची प्रार्थना

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. मकबा हाईट्स या इमारतीत बाबा सिद्दीकी हे १७ व्या मजल्यावर राहतात. तर त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी हे १८ व्या मजल्यावर राहतात

मरिन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार

त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं? 

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर 9 MM पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास हल्ला झाला. रात्री 11. 30 च्या सुमारास बाबा सिद्दिकी यांना डॉक्टरांना मृत घोषित केलं. रात्री 1. 30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात जाऊन झिशान सिद्दिकी आणि कुटुंबियांची भेट घेतली.

बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.