बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी? पोलीस तपासात 3 धक्कादायक कारणं उघड

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे.

बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी? पोलीस तपासात 3 धक्कादायक कारणं उघड
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 9:55 AM

Baba Siddique Shot Dead Reason : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या या तीन कारणांसाठी करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बाबा सिद्दीकींवर सहा गोळ्या झाडल्या

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. तर एक गोळी ही त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी?

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सध्या पोलिसांकडून तीन वेगवेगळ्या अँगलमधून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा गेल्या काही महिन्यांपासून रचण्यात येत होता. बाबा सिद्दीकींची हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांची राजकीय वैमनस्यातून कोणी सुपारी दिली होती का, याचाही तपास केला जात आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या पूर्वनियोजित

बाबा सिद्दीकी यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी किती वाजता घराबाहेर पडतात, ते कुठे जातात, या सर्व गोष्टींची माहिती हल्लेखोरांकडे होती. मात्र अद्याप बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी का करण्यात आली, याबद्दल माहिती समोर आलेली नाही. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या तीन जणांपैकी दोघांची ओळख पोलिसांना पटली आहे. यातील एका आरोपीचे नाव करनैल सिंह असे असून तो हरियाणातील आहे. तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून धर्मराज कश्यप असे त्याचे नाव आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या तिघांनाही चौथा व्यक्ती मार्गदर्शन करत होता, असेही बोललं जात आहे.

'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु.
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण.
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.