झिशान सिद्दीकी यांच्या बंदोबस्तात वाढ, घराबाहेर आरसीपी दल; येणाऱ्यांची कसून चौकशी
बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्सही लावले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकी यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या झिशान सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी मुंबई पोलिसांचे आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्सही लावले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
बाबा सिद्दीकी हे ज्येष्ठ नेते होते. तसेच ते माजी मंत्री होते. या घटनेनंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.