आता मोदींनाच विचारायला हवे खरे मोदी कोण?: छगन भुजबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारसाहेबांवर टीका पण करतात. यू टर्न केल्याचेही बोलतात आणि युतीसुध्दा करतात असे छगन भुजबळ यांनी म्हटले. | Chhagan bhujbal

आता मोदींनाच विचारायला हवे खरे मोदी कोण?: छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 3:39 PM

मुंबई: राज्यसभेतील भाषणादरम्यान भावूक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी टोला लगावला. आज कुणीतरी मला व्हॉटसअ‍ॅपवर पाठवलं आहे की, मोदींना राज्यसभेत गहिवरुन आले. त्यामुळे खरे मोदी कोण?, हा प्रश्न पंतप्रधानांनाच विचारायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. (NCP leader Chhagan bhujbal slams Narendra Modi)

राज्यसभेत मोदींनी पवार साहेबांवर टीका केली होती. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता छगन भुजबळ यांनी मोदींवर जोरदार टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारसाहेबांवर टीका पण करतात. यू टर्न केल्याचेही बोलतात आणि युतीसुध्दा करतात असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

‘आंदोलनजीवी’ कोण?; छगन भुजबळांनी भाजपला सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही आंदोलन असायचं. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली याची आठवणही छगन भुजबळ यांनी यावेळी करून दिली. आंदोलनजीवी अशा पध्दतीने हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता.

संबंधित बातम्या:

फडणवीसांच्या योजनेचं काऊंटडाऊन सुरु, ‘जलयुक्त शिवार’च्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

…आणि अजितदादांच्या एका फोनमुळे जालिंदर काकांवर उपचार, पवारांचं हळवं रुप पुन्हा जगासमोर

नाना पटोले म्हणतात, काँग्रेसला नंबर 1चा पक्ष बनवणार पण कसे?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

(NCP leader Chhagan bhujbal slams Narendra Modi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.