दसरा मेळावा शिंदे गटाचा, पण करोडो रुपयांचा भुर्दंड मुंबईकरांना, कुणी केला हा थेट आरोप?

मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या शौच व्यवस्थेचा खर्चदेखील मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. येथे फिरते शौचालय आणि बाथरूम यासाठी चार तारखेला निविदा काढून त्याच दिवशी त्या मंजूर केल्या.

दसरा मेळावा शिंदे गटाचा, पण करोडो रुपयांचा भुर्दंड मुंबईकरांना, कुणी केला हा थेट आरोप?
SHIVSENA DASARA MELAVA Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 7:02 PM

मुंबई : शिवसेना शिंदे गटाकडून एमएमआरडीए मैदानावर 5 ऑक्टोबर 2022 ला भव्य दसरा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमावर करदात्या सामान्य मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये मुंबई महानगरपालिकेने खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या एमएमआरडी मैदानाचे शुल्क मुंबई महानगरपालिकेने भरले आहे. शासकीय, निमशासकीय, धार्मिक अथवा राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी अशा कार्यक्रमासाठी महानगर पालिकेस निधी खर्च करता येतो. परंतु, शिंदे गटाचा दसरा मेळावा यापैकी कोणत्या कार्यक्रमात बसतो? असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अमोल मातेले यांनी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मुंबईकरांच्या कराचे 97 लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप केला आहे. एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाची जागा देण्यात आली. विद्यापीठाची जागा राजकीय कार्यक्रमाला देणे हे मुळात योग्य आहे का? एमएमआरडीकडे अनेक ठिकाणी पार्किंगसाठी मैदान असताना मुंबई विद्यापीठाचीच जागा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

मुंबईकरांचा निधी खर्च

दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी विद्यापीठाच्या मैदानातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. इतकेच नव्हे तर, विद्यापीठाची संरक्षण भिंत देखील तोडण्यात आली. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा वापरण्यात आली. सदरची संरक्षण भिंत पुन्हा बांधण्यात आली यासाठी पुन्हा मुंबईकरांचा निधी खर्च करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

निविदा काढून त्याच दिवशी मंजूर

मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या शौच व्यवस्थेचा खर्चदेखील मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. येथे फिरते शौचालय आणि बाथरूम यासाठी चार तारखेला निविदा काढून त्याच दिवशी त्या मंजूर केल्या. नियमाप्रमाणे आधी निविदा काढणे अपेक्षित होते. याबाबत खुद्द महापालिकेच्या दक्षता विभागाने ताशेरे ओढले असल्याचे मातेले यांनी सांगितले.

नियम डावलून खर्च

दसरा मेळाव्यासाठी दिलेल्या कामाचे परीक्षण करण्याकरिता दक्षता विभागास कळविण्यात आले नाही. याबाबत दक्षता विभागाकडून दंड ठोठावण्यात आला. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकरता नियम डावलून खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच, झालेला खर्च, कष्टकरी करदात्या मुंबईकरांच्या खिशातून न करता, संबंधित दसरा मेळाव्याच्या आयोजकांकडून अथवा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणीही अमोल मातेले यांनी केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.