धनंजय मुंडे प्रकरणात मी काही बोलणार नाही; जावयाच्या गुन्ह्याची शिक्षा सासऱ्याला का: जयंत पाटील
माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे पाटील यांनी सांगितले. | Jayant Patil on Dhanajay Munde
मुंबई: धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे पाटील यांनी सांगितले (NCP leader on Dhanajay Munde case)
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. संबंधित महिलेने त्यांच्यावर आरोप केले, पोलिसांनी त्याची तक्रारही दाखल करुन घेतली. त्यामुळे आता पोलीस तपास करुन पुढील कारवाईचा निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. मात्र, धनंजय मुंडे यांनी न्यायालयात पूर्वीच ब्लॅकमेलिंगची केस दाखल केली आहे, याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरता येत नाही’
या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी भाष्य करण्यात आले. नवाब मलिक यांच्या जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी फार बोलायचे टाळले. माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आलेली नाही, असे सांगत त्यांनी हा प्रश्न टाळला. मात्र, जयंत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रवेशाची शक्यता स्पष्टपणे नाकारलीही नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या:
जयंत पाटील यांचे एकाच दगडात दोन पक्षी, धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया
राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य
ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर
(NCP leader on Dhanajay Munde case)