‘राज्यपालांनी कायद्यात वेळ निश्चित नसल्याचा फायदा घेतला, आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला’

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेयत. | Nawab Malik

'राज्यपालांनी कायद्यात वेळ निश्चित नसल्याचा फायदा घेतला, आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:02 PM

मुंबई: कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केले आहे. जनहित याचिकेवर कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व कोर्टाला कळवतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. (NCP leader Nawab Malik take a dig at Governor Bhagat koshyari)

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विधानपरिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. मात्र, जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार, याची वाट पहावी लागणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेयत. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे 12 नावे पाठवलीयत. यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.

‘देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत’

सध्या देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करत आहेत, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टिप्पणी राऊत यांनी केली.

हायकोर्टाने जे राज्यपालांना विचारले ते आम्ही सरकार म्हणून कितीतरी दिवसांपासून विचारतोय. मात्र, राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणं हे घटनाविरोधी असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल

(NCP leader Nawab Malik take a dig at Governor Bhagat koshyari)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.