मुंबई: ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. (NCP leader Nawab Malik take a dig at Ramdev Baba)
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात. मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे मलिक यांनी म्हटले.
केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था तयार करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.
रामदेवबाबा डॉक्टर नाही. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत. रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात त्यापेक्षा दुर्दैवी घटना होवू शकत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास, अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक असल्याचेही त्यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
शरद पवारांकडूनच मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींचं आरक्षण अबाधित; नवाब मलिकांचं मोठं विधान
IMA ही इंग्रजांच्या काळातील NGO, त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- रामदेव बाबा
(NCP leader Nawab Malik take a dig at Ramdev Baba)