अब्दुल सत्तार असचं बोलत राहिला तर, आम्ही आमची संस्कृती बाजूला ठेऊ, अमोल मिटकरींचा इशारा…

आमचा पक्ष असं काही बोलत नाही, पण कोणी असं काय बोलला तर आमच्या पक्षाची संस्कृती आम्ही विसरून जाऊ.

अब्दुल सत्तार असचं बोलत राहिला तर, आम्ही आमची संस्कृती बाजूला ठेऊ, अमोल मिटकरींचा इशारा...
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 5:21 PM

मुंबईः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अमोल मिटकरी म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेले हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल जे अपशब्द अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्यांनी वापरले आहेत. त्यावरून अब्दुल सत्तार हा किती विकृत माणूस आहे हे लक्षात येईल.

कोणत्याही आई बहिणीचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, मात्र हिंदुत्वाच्या नावाचे राजकारण करून अशा पद्धतीची वक्तव्य करुन अब्दुल सत्तार जर असं वागत असेल तर भविष्यात त्याचे त्यांना उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे.

त्याबरोबरच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केले आहे ते चोवीस तासाच्या आत परत यावे नाही तर, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती कोणाला वाईट बोलणे ही नाही मात्र अशावेळी आम्ही आमच्या पक्षाची संस्कृतीसुद्धा विसरून जाऊ, पक्ष बाजूला ठेवू आणि अब्दुल सत्तार असाच बोलले तर त्याची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

अब्दुल सत्तार यांनी सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले जात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.