राज ठाकरे तुम्ही भूमिका मांडा, जिथं जाल तिथं तुमची रुपं बदलत जातात, मनसेच्या भूमिकांवर जोरदार हल्लाबोल
आमच्या राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जातात म्हणून वाईट वाटत नाही तर फक्त गुजरात गुजरात नका करू तर त्यासाठी देशातील सगळ्या राज्यांचा विकास करा असंही त्यांनी सांगितले.
मुंबईः राज ठाकरे यांच्या काल झालेल्या भाषणानंतर आता वेगवेगळी मतमतांतरं व्यक्त केली जात आहेत. कधी काळी रोखठोक भूमिका मांडणारे राज ठाकरे आणि त्यांच्या नवनिर्माण महाराष्ट्र सेनेचं नवनिर्माण होतं आहे का असा सवालही केला जात आहेत. कारण आहे राज ठाकरे यांनी सध्या चाललेल्या महाराष्ट्रातील वादावर कोणत्याही बाबतीत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधत तुम्ही जिथे जाल तिथं तुमची रुपं बदलत जातात असा टोला लगावला.
राज ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणामध्ये राज्यात चाललेल्या गदारोळामधील एकाही मुद्यावर स्पष्ट बोलणं टाळले होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर न बोलता त्यांनी जुन्याच त्यांच्या वाक्यावरून टीका केली.
गुजरात आणि मारवाडी यांच्याबद्दल बोलले होते. त्यावरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यावर बोलणं का टाळले असा सवालही काहीनी उपस्थित केला असून मनसेनं भूमिकांचे नवनिर्माण केलं आहे का असा प्रश्नही आता विचारण्यात येत आहे.
काही वर्षापूर्वी राज्याचे उद्योग पळवले जात आहेत त्यावरून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका केली होती. तर आता मात्र त्यांनी देशाच्या विकासाचा मुद्दा मांडत त्यांनी वेगळीच भूमिका मांडली.
ते म्हणाले की, आमच्या राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जातात म्हणून वाईट वाटत नाही तर फक्त गुजरात गुजरात नका करू तर त्यासाठी देशातील सगळ्या राज्यांचा विकास करा असंही त्यांनी सांगितले.
देश म्हणजे काय तर सर्व राज्यांचा समूह म्हणजे देश अशी भूमिका मांडत त्यांनी उद्योगधंद्याविषयी बोलताना टाळले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांसह पंढरपूर आणि अक्कलकोटवर दावा सांगितला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.
त्या वादावरही राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधत तुम्ही जिथे जाल त्या प्रमाणे तुमची भूमिका बदलते अशी खरमरीत टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.