“मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील”; योगींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीनं निशाणा साधला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो नाही तर इतर कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील; योगींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीनं निशाणा साधला
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 11:30 PM

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावरून दोन्हीकडून टीका करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या दौऱ्यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरवरही टीका केली आहे. गोरखपूर आणि मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक टीका करत ही मुंबई मराठी माणसाची आहे हाच सूर आळवत मुंबईवर पुन्हा एकदा मराठी माणसाचा हक्क कसा आहे तेही सांगितले.

त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो नाही तर इतर कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईची महती सांगताना त्यांनी मराठी माणसाची मुंबई कशी आहे हेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

कारण राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि येथील उद्योग याविषयी टीका केली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई, मुंबई आहे. ती मराठी माणसांची मुंबई आहे.

आणि मुंबईच्या मातीची शानच काही वेगळी आहे. मुंबईची मातीच परिस्पर्शाची माती असल्याचे सांगत अशी मुंबई जगाच्या पाठीवर बनूच शकत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांच्यवर टीका करताना भाजपच्या जुन्या नेत्यांनी मुंबईबद्दल केलेली वक्तव्यामुळे त्यांनी मुंबईवर मराठी माणसांची कसा हक्क आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.