राज्यपालांची वक्तव्यं, भाजप नेत्यांना आवडतात, राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपवर निशाणा साधला

राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य झाली तरी, आणि त्यांनी काहीही बोलले तरी त्यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत.

राज्यपालांची वक्तव्यं, भाजप नेत्यांना आवडतात, राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपवर निशाणा साधला
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 4:04 PM

मुंबईः गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कधी राज्यपाल तर कधी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय वातावरण तापवून ठेवले आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांविरोधात सगळे विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांकडून त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याच वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रोहित पवार यांनीही राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज्यपालांचे वक्तव्यावरुन वातावरुन अधिक ढवळून निघाले आहे.आम

दार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य झाली तरी, आणि त्यांनी काहीही बोलले तरी त्यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

एकीकडे राज्यात आलेले मोठ मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. त्यामुळे राज्यातील विकासावर आणि येथील रोजगारावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी या लोकांना अशी वादग्रस्त विधानं करायल सांगितली जात आहेत का अशी शंका आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे.

राज्यपाल हे संविधनिक पद आहे, राज्यपालांनी कुठलही राजकीय विधान करू नये, तसेच त्यांनी असांस्कृतिक विधानं करू नयेत असा अलिखित नियम असला तरी वादग्रस्त विधानं करुन त्यांच्याकडून वातावरुन गढूळ केले जात आहे अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची पातळी कळते असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजपचे नेते दिल्लीत बसून काही विधानं करतात, आणि त्याला विरोध भाजपचे नेते इथून करतात. त्यांनी वादग्रस्त वक्तवय् केले तरी महाराष्ट्रातील भाजपचे नेते त्यांना विरोध का करत नाहीत. याचा अर्थ राज्यातील भाजप नेत्यांना त्यांची विधानं आवडतात का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.