भाजपमधील कोणता नेता आवडतो? पाहा रोहित पवारांनी काय दिलं उत्तर
आज विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक नेटकऱ्याने विचारले आहे रोहित पवार यांना भाजपपामधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो. या प्रश्नावर त्यांनी अगदी स्पष्टपण उत्तर दिले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अनेकांनी त्यांना रिट्विटही केले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच रोहित पवार यांनी ट्विटरवरून आज जनतेबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना जनतेने विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देत महाराष्ट्राचा विकास कसा साधता येईल. त्याच बरोबर राज्याचा विकास साधत असताना त्यामध्ये युवकांचा सहभाग कसा घेता येईल याविषयीही त्यांनी चर्चा केली आहे. रोहित पवार यांना आज राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि शेतीविषयी अनेक प्रश्न विचारून आमदार रोहित पवार यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणारे आहेत.
आमदार रोहित पवार यांनी आज राज्याच्या धोरणामध्ये युवांचं प्रतिबिंब उमटावं आणि राज्य विकासाच्या शिखरावर पोहोचावं यासाठी सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ या संदर्भात जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित पवार यांनी आज राजकारण, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली आहेत.
आज विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक नेटकऱ्याने विचारले आहे रोहित पवार यांना भाजपपामधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो. या प्रश्नावर त्यांनी अगदी स्पष्टपण उत्तर दिले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अनेकांनी त्यांना रिट्विटही केले आहे.
गडकरी साहेब https://t.co/T7w4PFx0VB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
आजच्या प्रश्न उत्तरच्या काळात आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आले की, रोहित पवारांना भाजपामधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो. त्यावर त्यांनी गडकरीसाहेब असं उत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे त्यांनी नाव घेतले असले तरी त्यावर अनेकांनी रिट्विटही केले आहे.
राज्याच्या धोरणात युवांचं प्रतिबिंब उमटावं आणि राज्य विकासाच्या शिखरावर पोहोचावं यासाठी सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ #MVF संदर्भात मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यासाठी भेटुयात आज (रविवार) सायंकाळी ५ वाजता @RRPSpeaks ट्विटरवर. अवश्य सहभागी व्हा! pic.twitter.com/pCVCWwzCc7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
भाजपच वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी राज्यातील आणि देशातील रस्ते बांधकामामुळे नेहमीच चर्चेत राहणारे आहेत. राज्यात रस्ते बांधकामाचे प्रकल्प राबवण्यात आले. त्यामुळ नितिन गडकरी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. रोहित पवार यांच्या आजच्या ट्विटमुळे ते आमदार रोहित पवार आणि नितिन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.