Jayant Patil : अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री होण्याने शिंदेंचाच होणार ‘गेम’, जयंत पाटील थोडक्यात खूप काही बोलून गेले!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. पवारांनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या पुढील भूमिकेबाबत माहिती दिली. त्यासोबतच आता शिंदे यांचा पत्ता कट होण्याबाबत सूचक असं वक्तव्य पाटलांनी केलं आहे.

Jayant Patil : अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री होण्याने शिंदेंचाच होणार 'गेम', जयंत पाटील थोडक्यात खूप काही बोलून गेले!
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 9:53 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी सकाळीच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत शिंदे-फडणवीस सरकामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाहीतर राष्ट्रवादीचे बडे आणि शरद पवारांचे अत्यंत खास असलेल्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे इतर आमदारांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. पवारांनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या पुढील भूमिकेबाबत माहिती दिली.

जयंत पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत आता काळजी वाटत असल्याचं मिश्किलपणे म्हणत त्यांनी परत एकदा जाण्याची संधी असल्याचं सांगितलं.

एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवार हे अर्थमंत्री होते. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी देत नाहीत, असा आरोप करत एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं, असं शिंदे म्हणाले होते. आता अजित पवार यांनीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने, एकनाथ शिंदे यांनी परत जायला एक संधी असल्याचा टोला पाटलांनी लगावला.

मला आता शिंदेंची काळजी वाटत आहे, कारण आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गेले त्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, शिंदे जाताना 40 आमदार घेऊन गेले होते आता पवार किती आमदार घेऊन जातात हे दोन ते तीन दिवसात समोर येईलच. मात्र, शिंदेंना हा पर्याय शोधण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार करायला हवा, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदेंना सल्ला दिला आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. कारण शिंदेंना अजित पवार हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. भविष्यात शिंदेंना बाजू करत भाजपचा पवारांना सोबत घेऊन राज्यात सत्ता आणण्याचा प्लॅन असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.