मुंबई | राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वी 2 महिन्यांचा जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने आरोग्याच्या कारणांमुळे हा जामीन मंजूर करत दिलासा दिला. नवाब मलिक यांनी 1 वर्ष 5 महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांना जामीन मंजूर मिळाला. यानंतर अखेर जेलमधून सुटका झाली आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. त्यानुसार नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या दरम्यान रुग्णालयााबाहेर नवाब मलिक समर्थकांनी एकच गर्दी केली होती. यावेळेस शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. अखेर काही तासांच्या प्रतिक्षेनंतर नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर पडले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांकडून कुर्ल्यात जंगी स्वागत करण्यात आलं.
नवाब मलिक यांची हॉस्पिटलमधून बाहेर एन्ट्री होताच राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. नवाब मलिक यांच्या गाडीभोवती समर्थकांनी एकच गर्दी केली. नवाब मलिक यांच्या समर्थनाथ “कोण आला रे आला कोण आला? राष्ट्रवादीचा वाघ आला”, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या समर्थनासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली. यावेळेस नवाब मलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले.
तसेच त्यांच्या समर्थनासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली. यावेळेस नवाब मलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले.
दरम्यान नवाब मलिक यांना 6 अटीशर्थींवर जामीन देण्यात आला आहे. या 6 अटीशर्थींनुसार, नवाब मलिक यांनी 3 अटी पूर्ण केल्या आहेत. जामीनासाठी 50 रुपये दिले आहेत. तर घरचा पत्ता, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट जमा केला आहे. तर आता मलिक यांना साक्षीदार यांना धमकावून नये, माध्यमांशी संवाद साधून नये आणि गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये, अशा 3 अटीशर्थी पाळाव्या लागणार आहेत.