राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेत्याची निवड; तर आर. आर. आबांच्या लेकावर मोठी जबाबदारी

NCP Sharad Pawar Vidhansabha Group Leader : विधानसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात हालचाली वाढल्या आहेत. पक्षाच्या गटनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सर्वात कमी वयात आमदार झालेल्या आर. आर. आबांच्या लेकावर मोठी जबाबदारी देण्यात आलीय.

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेत्याची निवड; तर आर. आर. आबांच्या लेकावर मोठी जबाबदारी
शरद पवार, रोहित पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 9:14 AM

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीबाबत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता आणि मुख्य पतोदपदाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाचे जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. तर मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील, प्रतोद म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जाणकर यांची निवड झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. तर सर्वात कमी वयात आमदार झालेल्या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या लेकावर मोठी जबाबदारी दिली आहे. पहिल्यांदाच आमदार रोहित. आर. आर. पाटील यांची मुख्यप्रतोदपदी निवड झाली आहे. तर भाजपच्या राम सातपुतेंना हरवत विजय मिळणाऱ्या उत्तम जाणकर यांच्यावरही प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जयंत पाटील यांनी काय सांगितलं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 उमेदवार निवडून आले. यापैकी नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईतील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. दहापैकी नऊ आमदार उपस्थित होते. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मतदारसंघात सत्कार असल्याने ते उपस्थित नव्हते. या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली. मुख्य प्रतोदपदी आर. आर. पाटील, प्रतोद म्हणून आमदार उत्तम जाणकर यांची निवड झाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

विधिमंडळ पक्ष नेत्याबाबत निर्णय कधी?

विधान परिषदेचे आमच्या पक्षाचे सदस्य उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबतीत येत्या काळात निर्णय घेतला जाईल. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना बैठक होईल. तेव्हा त्याबाबचा निर्णय घेतला जाईल. तसंच विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवर देखील या बैठकीत चर्चा झाली, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.