मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज देशातील पहिला ‘एल.जी.बी.टी. सेल’ स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. (NCP Start LGBT Cell) एल. जी. बी. टी. समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नवीन सेल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
“आपल्या समाजातील एलजीबीटी लोक मुख्य प्रवाहात यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे याचा विचार करुन राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला. शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे”, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे 14 जण एलजीबीटी समुदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल सुरू करण्याचे ठरवले आहे. एल. जी. बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नविन सेल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.@supriya_sule
— NCP (@NCPspeaks) October 5, 2020
“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एल.जी.बी.टी. वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे”, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष आहे ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता ‘एलजीबीटी’ सेलची स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला”, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रिया पाटील यांनी एलजीबीटी का स्थापन करण्यात येत आहे याची माहिती दिली. शिवाय आपण काय करणार आहोत. आपण आजही अधिकारापासून कसे वंचित आहोत हे सांगतानाच राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याला हा अधिकार मिळवून द्यायचा आहे, अशी भूमिका स्पष्ट केली. (NCP Start LGBT Cell)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘एल.जी.बी.टी. सेल’ च्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती जाहीर केली. या सेलची इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी – माधुरी सरोदे – शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी – उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष – सावियो मास्करीनास, सदस्य – अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन आदी.
(NCP Start LGBT Cell)
संबंधित बातम्या
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी? जयंत पाटील म्हणतात….
Jayant Patil | Mumbai | भाजपने महाराष्ट्राच्या बाजूने बोलणे अपेक्षित होते : जयंत पाटील
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा एकेरी उल्लेखही चालवून घेतला नसता : जयंत पाटील