Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 7:58 PM

मुंबई : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिवाय अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त पैसे देत होते. तरीही उद्धव ठाकरे काही बोलत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटापासून बाहेर पडल्याचे शिंदे गटाचे नेते सांगत होते. तेच अजित पवार आता पुन्हा सत्तेत सोबत आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील म्हणाले, आजच्या घडामोडीनंतर हे कळलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्या पाठिशी उभे आहेत. अशी संकट येतात तेव्हा शरद पवार पुन्हा ताकदीने पुढं येतात. उद्या शरद पवार हे कराड येथे यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन करताना या राज्याचं राजकारण बेरजेचं असलं पाहिजे. राज्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे राजकारण पुढे जाईल, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

जयंत पाटील यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवार हे अर्थमंत्री होते. त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. म्हणून आम्ही तिकडे चाललो, असं शिंदे यांनी सांगितलं होतं. आता हेच सगळ्या तिकडे गेले असतील, तर एकनाथ शिंदे यांना परत जायला एक संधी आहे.

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते

अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यास आमच्या लक्षात आलं. हा निर्णय पक्षाला कळवला असता तर योग्य झालं असतं. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी शरद पवार यांच्या मान्यतेने जितेंद्र आव्हाड यांनी सोपवत असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

योग्य ती पाऊलं उचलू

दोन-तीन वाजता शपथविधी झाला. या घटना घडतील, असं कुणी गृहित धरलं नव्हतं. आता कुणी पक्षाच्या निर्णयाचे उल्लंघन केलं हे कळलं आहं. आता यासंदर्भात पक्षाच्या स्तरावर योग्य तो विचारविनिमय करून योग्य ती पाऊलं टाकू.

त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत कळेल

विधानसभेच्या निवडणुकीला वर्ष सव्वा वर्ष राहिलाय. ही विधानसभा वर्ष दीड वर्षानं बंद होणार आहे. नव्या निवडणुका लागणार आहे. लोकांच्या पाठिंब्याने निवडणुका होतात. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासोबत राहण्याची लोकांची भूमिका आहे. निवडणुकीत दर पाच वर्षांची चित्र बदलंत. त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत किती आहे, हे तुम्हाला नक्की कळेल, असंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.