राष्ट्रवादीने 16 जूननंतर जिल्हास्तरीय आंदोलनाचा दिला इशारा; वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) 23 वा वर्धापन दिन (Anniversary) 10 जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा (NCP Flag) व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व 16 जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या […]

राष्ट्रवादीने 16 जूननंतर जिल्हास्तरीय आंदोलनाचा दिला इशारा; वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:47 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) 23 वा वर्धापन दिन (Anniversary) 10 जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा (NCP Flag) व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व 16 जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संपर्क ठेवला आहे.

याच पार्श्वभूमीवर वर्धापन दिनी एक नवा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला असल्याची माहितीही महेश तपासे यांनी दिली.

समाज उपयोगी निर्णयांची देणार माहिती

प्रत्येक जिल्ह्यात 8 ते 10 जून रोजी जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे मंत्री व राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या समाज उपयोगी निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. 10 जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता झेंडावंदन होणार आहे तर सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हयात पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन करुन कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे.

घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

या वर्धापन दिनापासून प्रत्येक कार्यकर्त्यानी आपल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायमस्वरूपी उभारायचा आहे. याचबरोबर घराच्या दारावर पक्षाचा स्टीकर लावायचे आहे.

पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार

राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह 10 ते 16 जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित व्याख्यान आयोजन, याशिवाय तालुका, जिल्हास्तरावर युवक, युवती, विद्यार्थी यांच्याकरीताही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील महिला अध्यक्षांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ज्वलंत प्रश्नांसंबंधी 16 जून रोजी आंदोलन

सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत विविध प्रश्नांसंबंधी 16 जून रोजी आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आंदोलनात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण व विरोधी पक्ष करत असलेली दिशाभूल, केंद्र सरकारमधील भाजप पक्षाच्या नेत्यांकडून महिलांचा होणारा अपमान, शेतकर्‍यांच्या समस्या आदींचा समावेश असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.