Heat Waves : मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटा, बहुतांशी भागात पारा चाळिशीवर जाण्याची शक्यता
पुढचे दोन दिवस मुंबईत अधिक तापमान असणार असून लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
मुंबई : गेल्याच आठवडय़ात पावसाळी (maharashtra rain) वातावरणातील दमट हवामानाने हैराण झालेल्या मुंबईकरांना (mumbaikar) आता पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat Waves) सामना करावा लागणार आहे. यामध्ये मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असल्याने घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या आणि तब्येत सांभाळा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईत वाढलेल्या हवा प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये आधीच श्वसनाचे आजार वाढले आहेत.
मुंबईत शनिवारीही चांगलाच उकाडा होता
आता प्रत्येक आठवडय़ात बदलत असणाऱ्या वातावणामुळे मुंबईकर हैराण आहेत. आता तर तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारीही चांगलाच उकाडा होता. अनेक ठिकाणी पारा 36 ते 38 अंशांपर्यंत गेल्याने मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला.
त्यामुळे रुग्णालयात सुध्दा अधिक गर्दी आहे
मागच्या आठदिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणात पुर्णपणे बदल झाला होता. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या अनेक संसर्गजन्य आजारांनी तोंडवरती काढले आहे. त्यामुळे रुग्णालयात सुध्दा अधिक गर्दी आहे. बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
पुढचे दोन दिवस मुंबईत अधिक तापमान
पुढचे दोन दिवस मुंबईत अधिक तापमान असणार असून लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्याचबरोबर गरज असेल तरचं बाहेर पडा असंही आवाहन करण्यात आलं आहे.