ठाकरे सरकारला आणखी एक धक्का? मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA कडे जाण्याची शक्यता

ल्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर आता एटीएसकडे असणारी या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. | NIA Mansukh hiren death

ठाकरे सरकारला आणखी एक धक्का? मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA कडे जाण्याची शक्यता
साहेबच प्रमुख आहेत, आता पुढे काही होणार नाही.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 11:11 AM

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता याप्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर राज्य दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास करत आहे. (Mansukh hiren death case investigation may handover to NIA)

मात्र, गेल्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर आता एटीएसकडे असणारी या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NIA कडून बनावट नंबरप्लेट बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध

अंबानी स्फोटक प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबरप्लेट बनावट असल्याचे समोर आले आहे. या गाड्या अशाच वेगवेगळ्या नंबरप्लेट वापरुन इतर ठिकाणीही वापरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या बनावट नंबरप्लेट तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

या नंबरप्लेट सचिन वाझे यांच्या कोणत्या सहकाऱ्याने तयार केल्या होत्या का, याचा तपास सुरु आहेत. त्यासाठी CIU युनिटमधील चार अधिकाऱ्यांना रविवारी चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. यापैकी रियाझ काझी यांची एनआयएने रविवारी तब्बल 9 तास चौकशी केली होती. आजदेखील त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

वाझेंच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सचिन वाझे यांच्या ठाणे येथील घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज 2 मार्च रोजीच मुंबई पोलिसांनी काढून नेल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीत जवळपास 51 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज असणारा डीव्हीआर पोलिसांनी नेला, अशी माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली. हा डिव्हीआर नेमका कोणत्या पोलिसांनी नेला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(Mansukh hiren death case investigation may handover to NIA)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.